Nov 11, 2020
महाराष्ट्राचे हास्यसम्राट म्हणून प्रसिद्ध असणारे आणि सर्वांचे लाडके लेखक, गीतकार,
संगीतकार, नट पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे याचा ८ नोव्हेंबर हा
जन्मदिन होय.
त्याचे औचित्य साधून माय मराठी मंडळाने आपल्या सदस्यांसाठी ‘मला भावलेले पु. ल.’ हा पु.
ल. देशपांडे यांच्या आवडत्या लेख आणि पुस्तकांच्या वर्णनाचा उपक्रम घेतला.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्याच्या या काही वेचक प्रतिक्रिया:
पु ल हे खूप आवडते लेखक, कारण त्यांचा विनोद हा सहजसुंदर आणि समजायला सोपा !
शाळेत असताना पुलंची पुस्तके कमी वाचली पण मुख्यत्वे ते भेटले ते त्यांच्या कथाकथनातून
! अंतू बरवा, म्हैस, बटाट्याची चाळ आणि रावसाहेब ही माझी अत्यंत आवडती कथाकथाने आहेत.
त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली तसेच बटाट्याची चाळ पुस्तकात पुलंनी अनेक अवली पात्रांचे
वर्णन केले आहे ते निव्वळ उत्कृष्ट !!
पण माझे आवडते पुस्तक मात्र "हसवणूक" होय. पुलंच्या काही निवडक लेखांचा हा संग्रह आहे.
त्यात अनेक ठिकाणी खूप सुंदर आणि बारकाईने केलेली निरीक्षणे मनाला भावली. माझे खाद्य
जीवन, पाळीव प्राणी अशा लेखांतून त्यांनी वर्णन, माहिती आणि विनोदी शैली याचा अप्रतिम
मिलाफ साधला आहे. साधारण १९६५ सालचे हे पुस्तक अजूनही तितकेच टवटवीत वाटते.
IISER मध्ये असताना अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पुस्तके वाचणे सुरू केले होते, आता लवकर
परत जाऊन वाचन सुरू होईल ही अपेक्षा !
- अथर्व
I'm not the kind to read Marathi books, not by myself at least. Even if I try, it'll
take ages and won't be fun. But a few years ago, my roommate shared a few audio
files of stories by P. L. Deshpande along with movies and songs. I didn't ask for
it, but he said I'd enjoy it.
Accidently later I came across one of those while playing music (shuffled).
Mumbaikar, Punekar & Nagarkar! His descriptions literally came alive in front of my
eyes as if it were a live scene. Unlike a bassy voice of any man, his Punekar tone
with the specific words he preferred, made him stand out among others, I'd say.
And I ended up listening to all of the others. No heavy words, no long sentences,
and a very small number of presumptions make him relatable to a wide range of age
groups. What I personally like is the focus on subtle things rather than what one
thinks or feels, it's just kept raw! It's up to the listener/reader, how to take
it…
- Pranav
मी इयत्ता आठवीत असताना पु ल यांचं पूर्वरंग हे पुस्तक वाचलं होतं.
मला फारसं काही आठवत नाही मात्र, जेवढं आठवतंय तेवढं मी इथे मांडण्याचा प्रयत्न
करतो.
पूर्वरंग हे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे ज्यामध्ये पु ल व त्यांच्या सौभाग्यवती जेव्हा
पूर्वेकडील देशांमध्ये ( इंडोनेशिया, तैवान इत्यादी)
प्रवास करतात तेव्हांच प्रवास वर्णन.
या पुस्तकातून वाचकाच्या असं लक्षात येतं की साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा पु ल
किती विनोद शोधून काढतात.
या पुस्तकातून पु ल यांच्या विनोदी बुद्धीची कल्पना येते !
- हृषीकेश
संकलन: अथर्व भिडे