By Shrutika Lokapure

 August 22, 2020

माझी कविता : तू

...

तू तुझा मनात येतो विचार आणि जग सारं थांबतं
आई म्हणते की ग, हल्ली तुझं लक्ष कुठे असतं?

काय सांगू तिला मी प्रेमात होते पडले
भान गेले, लक्ष गेले, आणि पुढे काय काय घडले

मनात आहेस डोक्यात आहेस पण आहेस तू किती दूर
तुझ्याशी नीट स्पष्टपणे बोलण्याची लागली मला हुरहूर

प्रत्येक गोष्टीत मला तू एवढा का रे आवडतोस?
तुला मी का बरं आवडत नाही? असं काय रे तू करतोस?

तुला मी आवडले असते तर सारं किती सोपं झालं असतं
तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू जसकसं जुळून वाटत मस्त

कधीतरी आपल्यात होती सुंदर मैत्री आणि होता अलगद जिव्हाळा
आता मात्र उरलय ते फक्त राग, गैसमज आणि जाणून बुजून केलेल्या टाळाटाळा

अरे का नाही रे होऊ शकत सारं परत सरळ आणि सोप्पं
अरे एकदा तरी नीट बोल, राहतोस का रे तू नुसता गप्प गप्प

तुझा अबोला आणि दुरावा नाही रे सहन होत आता
तुझ्या आठवणी पुन्हा पुन्हा स्मरत गेल्या कितीतरी राती

एवढे सगळे अवघड कधी रे होऊन गेलं
काहीच मार्ग नाही उरला, message नको, पत्र नको, आणि नको ते email

अफाट प्रयत्नातून मी स्वतःला हल्ली रमवते
कधी वाचन, कधी भाषा तरी कधी नाच-गाण्यात मन गुंतवते

नाही द्यायचा मला तुला त्रास आणि नाही रे रडत बसायचं
पण तू हवाहवासा नको वाटायला, तूच सांग नेमकं काय करायचं

का रे येतोस तू समोर सारखा आणि मनात घर करतोस?
जेव्हा विचारायचं ठरवते मी तेव्हाच स्वप्नात येऊन हसतोस आणि हसवतोस

एवढे प्रयत्न केले तरी तुझ्या मनात काय आहे मला काहीच ठाऊक नाही
पण तुला तरी माझ्या मनाची अवस्था कधी कळणार का रे काही?

पण आता आपापला अभ्यास, आपापली स्वप्न आणि आपापले आव्हाने आहेत समोर
तू तुझ्या वाटेला मी माझ्या वाटेला, जसे अमृतसर आणि लाहोर

विसरून जाणे अभ्यासाला लागणे हाच मार्ग आहे उरला...
कितीही अवघड वाटले तरी चक्क “दुर्लक्ष कर” यावर विश्वास आता बसला!!

हसत, रडत, धडपडत आणि तुला विसरत आता मीच स्वतःला सावरणार
थांबते आता मी कारण ही कविता देखील तुझ्यापर्यंत कधीच नाही पोहोचणार !

-श्रुतिका लोकापुरे